Sukanya Samriddhi Yojana:
मुलींसाठी ही योजना जोखीममुक्त, करमुक्त, तिप्पट परतावा मिळवा, असा घ्या लाभ
Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची बचत योजना आहे. बेटी पढाओ, बेटी बचाओ योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलींना भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये म्हणून हा या सुकन्या समृद्धी योजनेचा उद्देश आहे. ही करमुक्त योजना आहे. यामुळे खूप मुलींना याचा फायदा मिळू शकतो.
Sukanya Samriddhi Yojana : EEE म्हणजेच या योजनेवर तीन वेगवेगळ्या स्तरांवर कर सूट उपलब्ध आहे. |
Sukanya Samriddhi Yojna : केंद्र सरकारकडून अनेक लहान बचत योजना चालवल्या जात आहेत. ज्यांना थोडे पैसे गुंतवायचे आहेत आणि भविष्यासाठी भरीव निधी तयार करायचा आहे त्यांच्यासाठी या योजना खूप उपयुक्त आहेत. तुम्हालाही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी गुंतवणूक करायची असेल, तर सुकन्या समृद्धी योजनेत (SSY) गुंतवणूक करणे तुमच्यासाठी अधिक चांगले ठरू शकते. बेटी पढाओ बेटी बचाओ योजनेअंतर्गत केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. आर्थिक दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलींना भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये हा या योजनेचा उद्देश आहे.
या योजनेची खास गोष्ट म्हणजे यामध्ये 250 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. इतर योजनांच्या तुलनेत यामध्ये व्याज देखील चांगले आहे. यासोबतच कर सवलतीचाही लाभ मिळतो. सुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या वयाची 10 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी गुंतवणूक केली जाते.
0 Comments